बाक वाजवला म्हणून पहिलीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

शिक्षक वर्गाबाहेर गेल्याने वर्गातील विद्यार्थ्यांनी बेंच वाजवण्यास सुरुवात केली. 

Updated: Oct 15, 2018, 07:15 PM IST
बाक वाजवला म्हणून पहिलीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण  title=

पुणे : पुणे जिल्हातील राजगुरूनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकानेच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षक वर्गाबाहेर गेल्याने वर्गातील विद्यार्थ्यांनी बेंच वाजवण्यास सुरुवात केली.

वर्गातील विद्यार्थी जोरजोरात बेंच वाजवत असल्याचे पाहिले असता शिक्षकाला राग अनावर झाल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना छडीने मारहाण केली.

शिक्षकावर गुन्हा

शिक्षकांने छडीने मुलाच्या पाठीवर वळ उठेपर्यंत जबर मारहाण केली. 

याप्रकरणी शिक्षक लक्ष्मण कडलग याच्यावर विरोधात मुलाच्या आईने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.