जे हे एका पुणेकराला जमलंय, ते मुंबईकरांना जमणारच नाही?

पुणेकर माणूस कुठे काय करेल याचा नेम नाही. हे खालील घटनेवरून म्हटलं जातंय.

Updated: Apr 12, 2018, 12:35 PM IST

पुणे : पुणेकर माणूस कुठे काय करेल याचा नेम नाही. एका महोदयांनी आपली गाडी डबल पार्क केली होती. गाडी नियमबाह्य पद्धतीनं पार्क केली म्हणून वाहतूक पाेलिसांनी त्याच्या गाडीला जामर लावला. कमलेशकुमार शुक्ला यांनी गाडी मालकाच्या नात्यानं संबंधित पोलिस कर्मचार्यांशी संपर्क साधून योग्य तो दंड भरल्यानंतर जामर काढून घेणं आवश्यक होतं. मात्र या पठ्ठ्यानं ते करण्याऐवजी दुसराच उपद्व्याप केला. त्यानं जामर काढण्याऐवजी स्टेफनी लावून आपल्या गाडीचं चाकच काढून घेतलं. 

पोलिसांचे २ बीट मार्शल्स तात्काळ घटनास्थळी

मात्र हा सगळी प्रकार पोलिसांच्या नजरेतून सुटणं शक्य नव्हतं. त्यामुळे पोलिसांचे २ बीट मार्शल्स तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या साहेबांना मुद्देमालासह अटक केली. पोलिसांचा जामर चोरल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आलाय. शुक्ला साहेबांचा हा प्रताप पुण्यातील टाईम्सचे फोटोग्राफर मंदार देशपांडे यांनी कैद फोटोत कैद केलाय.