फडणवीसांनंतर शाहांवर बरसले ठाकरे, म्हणाले, 'ते अहमद शाह अब्दालीचे वंशज..'

Pune Uddhav Thackeray: नवीन संसद भवनही गळतंय. संसद भवन ज्यानं बांधलय तोच कॉन्ट्रॅक्टर नदी बुजवण्याचे काम करतोय. कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, अशी योजना सुरु आहे. 3 महिने थांबल्यावर यांचा हिशोबही चुकता करणार असल्याचे ठाकरे म्हणाले. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 3, 2024, 02:22 PM IST
फडणवीसांनंतर शाहांवर बरसले ठाकरे, म्हणाले, 'ते अहमद शाह अब्दालीचे वंशज..' title=
उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका

Pune Uddhav Thackeray: एकतर तू नाही तर मी, असं विधान मी केलं होतं. अनेकांना वाटलं मी त्यांना बोललो. पण मी ढेकणाला आव्हान देत नाही. माझ्या नादाला लागण्याच्या कुवतीचा तू नाहीयस, अशा टिका उद्धव ठाकरेंनी नाव घेता देवेंद्र फडणवीसांवर केली. शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना सुरुवातीलाच त्यांनी फडणवीसांचा समाचार घेतला. अहमद शाह अफदालीचा वंशज म्हणून त्यांनी यावेळी अमित शाह यांचा उल्लेख केला. प्रत्येकवेळी गद्दरानी आपला घात केल्याचे ते म्हणाले. मेहबूबा मुफ्ती, नितीश कुमार,चंद्राबाबू नायडू हे काय हिंदुत्ववादी आहेत ?तुम्ही त्यांच्यासोबत गेलं तर चालते, अशी टीका त्यांनी केली. भाजपचा सत्ताजिहाद सुरु असून सत्तेसाठी वाट्टेल ते सुरु असल्याचे ते म्हणाले. 

संसद भवन ज्यानं बांधलय तोच कॉन्ट्रॅक्टर नदी बुजवतोय

पुण्यात पूर आला. त्यात शेकडो संसार वाहून गेले. याला जबाबदार असणाऱ्यांना आपल्याला फासावर नाही पण उलटं लटकावयचे आहे.पुण्यात नदी सुधारच्या नावाखाली नदीवर भराव टाकण्यात आला. मला पुणे वाचवायचे आहे. आम्ही त्याला स्थगिती दिली होती. पण यांनी पुन्हा काम सुरू केल्याचे ते म्हणाले.  नवीन संसद भवनही गळतंय. संसद भवन ज्यानं बांधलय तोच कॉन्ट्रॅक्टर नदी बुजवण्याचे काम करतोय. कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, अशी योजना सुरु आहे. 3 महिने थांबल्यावर यांचा हिशोबही चुकता करणार आहे. मोदीजी कॉंग्रेसकडे 60 वर्षाचा हिशोब मागतात. 12 महिन्यात तुमचं सगळंच बांधलेलं गळतंय. संसद गळतंय, राम मंदिर गळतंय, पेपर गळतायत म्हणजे लिक होतायत. असे रस्ते बनवेन की 200 वर्षे खड्डेच पडणार नाहीत, असे गडकरी म्हणतात. पण मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे आहेत. एका खड्डा पुरुष म्हणून त्यांना पुरस्कार द्या.

भाजपच्या अब्दालीला संघाचे विचार मान्य नाहीत का ?

गेल्या आठवड्यात पुण्यात आले होते. लोकसभेला कुठे कुठे फटके पडलेत ते बघायला.अहमदशा अब्दालीचा वंशज अमित शाह पुण्यात आला होता.आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणाल्याची टीका ठाकरेंनी केली. भाषणावेळी देवरसांच्या पत्राचा दाखला उद्ध व ठाकरेंनी दिला. बाळासाहेब देवरस यांनी तत्कालीन इंदिरा गांधींना पत्र लिहिले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमांचा द्वेष करत नाही असं त्यांनी म्हटलं होतं.भाजपच्या अब्दालीला संघाचे विचार मान्य नाहीत का ? असा प्रश्न त्यांनी विचारला. खुर्चीचा मोह कसा असतो हे देवरस यांनी त्यावेळी लिहून ठेवलंय, हिंदू हा विश्वासघात करणारा नाही, इतरांची घर जाळायला आम्हाला छत्रपतींनी शिकवलं नाही, असे ते म्हणाले. 

जनतेकडून मला न्याय मिळेल

येत्या 50 वर्षात निकाल नक्की लागेल हा न्यायदेवतेवर अंधविश्वास आहे.  कोर्टाकडून न्यायाला उशीर होतोय. पण जनतेकडून मला न्याय मिळेल. जनता न्यायालयात सुनावणी आजपासून सुरु झालीय. जनतेच्या न्यायालयात मला न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मी मशाल निशाणी जाणिवपूर्वक निवडलीय. यावेळी लाडकी बहीण योजनेवरुनदेखील त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. 

वाघनखांवरुन मुनगंटीवारांवर टीका

नखांच्या मागे शिवाजी राजा म्हणून वाघ होता म्हणून त्याला अर्थ आहे. पण नखांच्या मागे मुनगंटीवार असेल? नख आणि मुनगंटीवार शोभतंय का? शिवाजी महाराजांची वाघनख म्हणजे महाराष्ट्राची जनता असल्याचे ते म्हणाले.