सीएनजी दरवाढीने रिक्षा चालक संतप्त, खासदारांच्या कार्यालयावर नेणार धडक मोर्चा

CNG price hike in Pune : शहरातील रिक्षा चालक आक्रमक झाले आहेत. CNG दरवाढीविरोधात त्यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.  

Updated: Aug 4, 2022, 02:38 PM IST
सीएनजी दरवाढीने रिक्षा चालक संतप्त, खासदारांच्या कार्यालयावर नेणार धडक मोर्चा  title=

पुणे : CNG price hike in Pune : शहरातील रिक्षा चालक आक्रमक झाले आहेत. CNG दरवाढीविरोधात त्यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयावर  रिक्षा चालक  येत्या मंगळवारी सकाळी मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

महागाईचा भडका : पुन्हा खिशाला कात्री, इंधन दरात वाढ

सीएनजी दरवाढीने किलोचा दर 91 रुपयांवर पोहोचला आहे. पेट्रोल आणि डिझेल प्रमाणे सीएनजीचे दर वाढत आहेत. या दरवाढीस केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे, असा आरोप रिक्षा चालकांनी केला आहे.

सततच्या दरवाढीने रिक्षा चालक अडचणीत सापडले आहेत. दरवाढीविरोधातील रिक्षा चालकांचा संताप केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयावर  रिक्षा चालक येत्या मंगळवारी सकाळी मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती रिक्षा चालकांकडून देण्यात आली.

सीएनजीच्या दरात अशी वाढ झाली तर शंभरी पार होईल. या दरवाढीबाबत रिक्षा चालकांच्या भावना तीव्र आहेत. या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी नऊ ऑगस्ट क्रांती दिनी, सकाळी साडेदहा वाजता बुधवार पेठेतील मजूर अड्डा येथून महागाईविरोधी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे.

सीएनजीदराची सरासरी करुन अंतिम दर ठरवावा, अशी मागणी रिक्षा चालकांकडून करण्यात येणार असल्याची माहिती रिक्षा पंचायतचे सरचिटणीस नितीन पवार यांनी दिली.