पुण्यात अल्पवयीन मुलीवर काकाकडून बलात्कार आणि हत्या

मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर गळा दाबून खून

Updated: Dec 8, 2018, 04:39 PM IST
पुण्यात अल्पवयीन मुलीवर काकाकडून बलात्कार आणि हत्या  title=

पुणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना पुण्यात घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून तो मुलीच्या मावशीचा नवरा असल्याचं उघड झालंय. धायरी परिसरातील गारमाळा भागात गुरुवारी भरदिवसा ही घटना घडली. मुलीचे आईवडील मजुरी करतात... ते कामावर गेले तेव्हा वैष्णवी घरी एकटीच होती... संध्याकाळी कामावरून घरी परतले तेव्हा घरात मुलगी बेशुद्धावस्थेत पडली असल्याचं दिसलं. त्यांना तिला तातडीने डॉक्टरांकडे नेलं मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी वैष्णविचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यात मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय.