पुणे : पुण्यातही पावसानं दमदार कमबॅक केले आहे. गुरुवारी दिवसभर फारसा जोर जाणवला नाही, मात्र रात्री पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. आजदेखील सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे.
विशेष म्हणजे पुण्याच्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरु. पुण्याला पाणीपुरवठा करणार्या पानशेतचा साठा ५० टक्क्यांवर गेलाय, तर वरसगाव, खडकवासला २५ टक्के भरलेत.
टेमघरदेखील १० टक्क्यांवर पोहचला आहे. या पावसामुळं पुणेकरांना मोठा दिलासा मिळालाय. महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील रखडलेल्या पेरण्या या पावसामुळे सुरु होणार आहेत. त्याचप्रामणे काही भागातील दुबार पेरणीचं संकट तूर्तास टळलंय.