पुणे-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात, ५ ठार

भीषण अपघातात ५ ठार तर ४ जण जखमी झालेत.

Updated: Apr 27, 2018, 05:30 PM IST

सातारा : साताऱ्यामध्ये पुणे-पंढरपूर मार्गावर बरड जवळ झालेल्या भीषण अपघातात ५ ठार तर ४ जण जखमी झालेत.कार चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली आणि अपघात झाला. मृतामध्ये तीन अल्पवयीन मुलांसह २ जण जागीच ठार झाले. फलटण तालुक्यातील बरड इथे ही अपघाताची घटना घडली.