पुणेः भांडणात मुलगी सतत आईची बाजू घ्यायची, वडिलांनी पत्नीसह लेकीचा जीव घेतला

Pune Crime News: कौटुंबिक कारणातून पतीनेच पत्नी आणि मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, खुनानंतर पतीदेखील पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 17, 2024, 11:34 AM IST
पुणेः भांडणात मुलगी सतत आईची बाजू घ्यायची, वडिलांनी पत्नीसह लेकीचा जीव घेतला title=
pune news Man kills wife daughter after monetary dispute

Pune Crime News: पती-पत्नीतील नात्यात अनेकदा वाद होतात. पण हे सामान्य आहे. मात्र कधी कधी पती-पत्नीतील वाद इतके टोकाला जातात की त्यातून भयंकर घटना घडतात. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुहेरी खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. पतीनेच पत्नी आणि मुलीची निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

कौटुंबिक कारणातून पतीनेच पत्नी आणि मुलीचा चाकुने वार करून आणि उशिने तोंड दाबून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आज पहाटेच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दत्तनगर परिसरात हा प्रकार घडला आहे. खून केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. 

श्वेता तळेवाले (वय ४०) शिरोली तळेवाले (वय १६) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत.  तर अजय तळेवाले (वय ४५) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीत मागील काही दिवसांपासून सतत भांडण होत होते. आर्थिक वादातून त्यांच्यात सतत वाद होत होते. त्याचे रूपांतर शुक्रवारी रात्री भयंकर प्रकारात घडले. पती-पत्नी यांच्यात शुक्रवारी पुन्हा भांडण झाले. यावेळी पत्नीने तुम्हाला सोडून मी माहेरी निघून जाईल असे सांगितले आणि त्यानंतर आरोपीने रागाच्या भरात झोपलेल्या पत्नीच्या हाताची नस कापली. त्यानंतर उशिने तोंड दाबून तिचा खून करण्यात आला.

वडिलांनी आईचा खून केल्यानंतर हा सर्व प्रकार घडत असताना मुलगी देखील त्या ठिकाणी आली.. मुलगी भांडण झाल्यानंतर नेहमी आईची बाजू घेत असल्याने त्याचा राग आरोपीच्या मनात होताच. त्याने तिचाही तोंडावर उशी दाबून खून केला. या संपूर्ण प्रकारानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पुण्यातील सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याची पावणे तीन कोटींची फसवणूक

पुण्यातील सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याची पावणे तीन कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याच्या आमिषाने महिलेला गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी ज्येष्ठ महिलेने (वय ७०) सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.