Pune News : FTII मधील 'त्या' बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune News Today: पुण्यातून पुन्हा एकदा नजरा वळवणारी बातमी समोर आली असून, यावेळी FTII आणि तेथील विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या एका कृत्यामुळं निर्माण झालेली परिस्थिती विषयाचं गांभीर्य समोर आणत आहे.   

सागर आव्हाड | Updated: Jan 24, 2024, 11:49 AM IST
Pune News : FTII मधील 'त्या' बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल  title=
Pune News : पुण्यातून पुन्हा एकदा नजरा वळवणारी बातमी समोर आली असून, यावेळी FTII आणि तेथील विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या एका कृत्यामुळं निर्माण झालेली परिस्थिती विषयाचं गांभीर्य समोर आणत आहे.

अरुण मेहेत्रे, सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील FTII मधील वादग्रस्त बॅनर प्रकरणी FIR नोंदवण्यात आला (Pune Latest News). या गंभीर प्रकरणासंदर्भात संस्थेतील 7 विद्यार्थ्यांवर डेक्कन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ayodhya Ram Mandir) अयोध्येत राम मंदिर लोकार्पण सोहळा होत असताना तेथील काही विद्यार्थ्यांनी (Babri) बाबरीच्या स्मरणार्थ एक बॅनर कॅम्पस मध्ये लावला. त्यावरून परिसरात तणावाचं वातावरण होतं. तणावाच्या या वातावरणाची दखल पोलिसांनी घेत आता या प्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय)अर्थात पुण्यातील FTII या संस्थेत "रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन" अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरमुळं निर्माण झालेला तणाव पाहता सदर प्रकरणी FTI संस्थेतील विद्यार्थ्यांवर पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेसुद्धा वाचा : सोमवारी मिरवणुकीवर दगडफेक अन् मंगळवारी घरांवर 'बुलडोझर'! मुंबईत योगी स्टाइल कारवाई

 

FTII मधील बॅनर वरून पुण्यात मोठा वाद निर्माण झाला. इतकंच नव्हे तर, सोमवारी दोन विद्यार्थी संघटनांमध्ये बॅनरवरून राडाही झाला. ज्यानंतर हे प्रकरण पोलिसांमध्ये पोहोचलं आणि विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर काही हिंदूवादी विद्यार्थी संघटनांकडून संस्थेत जात बॅनर फाडण्यात आले होते. अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर पुण्यातील FTII संस्थेत हे वादग्रस्त बॅनर लावल्यामुळं एका नव्या वादाला वाचा फुटली होती. 

घडल्या प्रकरणी विद्यार्थी संघटना म्हणते...

'एफटीआयआय'मधील विद्यार्थी संघटनांनी यासंदर्भातील निवेदन देत आपली भूमिका स्पष्ट केली. संस्थेच्या आवारात आलेल्या जमावानं तिथं असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना न जुमानता ते पुढे आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता जमावाकडून त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली, यावेळी सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मात्र बघ्यांची भूमिका घेतल्यामुळं आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो, असं विद्यार्थ्यी संघटनेच्या वतीनं एका निवेदनात स्पष्ट करण्यात आलं.