मुंबई : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. ताप आल्यामुळे मुरलीधर मोहोळ यांची कोरोनाची चाचणी केली. शनिवारी ४ जुलै रोजी सायंकाळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचं समजलं.
पुण्यात आतापर्यंत महापौरांसह पाच नगरसेवकांना आणि एका उपायुक्तांना कोरोनाची लागण झाली आहे. चारही नगरसेवक कोरोनामुक्त झाले आहेत. महापौर यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.
थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.
आपला,
मुरलीधर मोहोळ, महापौर— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 4, 2020
थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील. आपला, मुरलीधर मोहोळ, महापौर असं त्यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ पुण्याच्या करोना विरुद्धच्या लढाईत पहिल्यापासूनच नेतृत्व करत आहेत. पुणे पालिका हद्दीत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी महत्त्वाचे निर्णय घेतले. लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन, रुग्णांवरील उपचार याबाबत सरकारच्या व पालिकेच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी त्यांचे प्रयत्न राहिले.
उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही मोहोळ यांच्या कामाचे कौतुक केले आहे. आता करोना संसर्ग झाल्याचे कळल्यानंतरही त्यांनी महापौर म्हणून आपल्या जबाबदारीचे भान राखले आहे. रुग्णालयात उपचार घेत असतानाही ते सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून स्थितीचा आढावा घेत राहणार आहेत.