पुणेकरांनो, मॅरेथॉनमध्ये सहभागी होता येणार नाही कारण...

पुणे मॅरेथॉनला दोन दिवस शिल्लक असताना भारतीय अॅथलेटिक्स महासंघानं मॅरेथॉनची मान्यता रद्द केली गेलीय. 

Updated: Dec 1, 2017, 06:03 PM IST
पुणेकरांनो, मॅरेथॉनमध्ये सहभागी होता येणार नाही कारण...  title=

पुणे : पुणे मॅरेथॉनला दोन दिवस शिल्लक असताना भारतीय अॅथलेटिक्स महासंघानं मॅरेथॉनची मान्यता रद्द केली गेलीय. 

इतकंच नाही तर खेळाडूंना मॅरेथॉनमध्ये सहभागी न होण्याच्या सूना दिल्या गेल्या आहेत. यामुळे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या अस्तित्वावरचं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 

खेळाडुंची सुरक्षितता धोक्यात?

'भारतीय अॅथलेटिक्स महासंघा'नं पुणे मॅरेथॉनला मान्यता नाकारली आहे... तसंच खेळाडूंच्या सुरक्षेबाबतही काळजी वाटत असल्याचं भारतीय अॅथलेटिक्स महासंघानं पाठवलेल्या पत्रात नमून केलंय.

दरम्यान, असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन या शिखर संघटनेनं पुणे मॅरेथॉनला मान्यता दिलीय. त्यामुळे, भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या मान्यतेचा प्रश्नच उद्धवत नाही, अशी भूमिका संयोजकांनी घेतली आहे. यामुळे पुण्याच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.