सासूचा त्रास; जावयाचा गळफास, बायकोच्या ओढणीलाच बनवला फास

सुसाईड नोट लिहून गर्भवती पत्नीला सोडून त्याने आपलं आयुष्य संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना

Updated: Aug 23, 2021, 08:15 PM IST
सासूचा त्रास; जावयाचा गळफास, बायकोच्या ओढणीलाच बनवला फास title=

किरण ताजणे झी मीडिया पुणे: सासच्या मंडळीनी छळलं किंवा जाच केला म्हणून सूनेनं आत्महत्या केल्याचं किंवा तक्रार दाखल केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मात्र पत्नीच्या सासरच्यांनी छळलेल्याच्या तणावातून एका व्यक्तीनं आपलं आयुष्य संपलं आहे. सासरच्या जाचाला कंटाळून एका जावयानं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 

पुण्यातील शिवाजीनगर-गोखलेनगर येथे सुगम चाळीमध्ये राहणाऱ्या निखिल धोत्रे यांनी संध्याकाळच्या सुमारास हे धक्कादायक पाऊल उचललं. रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेतला. निखिल यांनी आपलं आयुष्य संपवण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. 

निखिल धोत्रे हे मानसिक तणावात होता, असं सांगितलं जातंय. त्याच्या पत्नीनंही काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. ती गर्भवती असल्याचं समजत आहे. त्यामुळं निखिलच्या आत्महत्येला वेगळं वळण लागलं आहे.

पोलीस तपासात खरं काय ते निष्पन्न होईलच. मात्र सासरच्या जाचाला कंटाळून जावयाला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागणं निश्चितच चिंताजनक आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून सध्या सुसाईड नोटच्या आधारे तपास सुरू आहे.