North East Mumbai Lok Sabha Election Result in Marathi: ईशान्य मुंबई हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केल्यामुळं ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपने मिहीर कोटेचा यांना तिकिट दिले आहे. तर, महाविकास आघाडीने संजय दीना पाटील यांना रिंगणात उतरवले होते. ईशान्य मुंबईत संमिश्र लोकवस्ती आहे. त्यामुळं महाविकास आघाडी की महायुती यांच्यात कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघात मतमोजणीला सुरूवात झाली असून काहीच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे.
ईशान्य मुंबईत संजय दीना पाटील आणि मिहीर कोटेच्या यांच्यात लढत होत आहे. उत्तर पूर्व मुंबई म्हणजेच ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाचे दीना पाटील हे 12202 मतांनी पुढे आहेत. तर, भाजपचे मिहीर कोटेचा हे पिछाडीवर आहेत. ईशान्य मुंबईत गेले दोन टर्म म्हणजेच 2014 मध्ये किरीट सोमय्या आणि 2019 मध्ये मनोज कोटक ईशान्य मुंबईतून खासदार झाले होते. त्यामुळं पुन्हा भाजप या मतदारसंघात वर्चस्व राखण्यास यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.