पुणे शहरात नवी नियमावली जाहीर; काय सुरू, काय बंद?

नव्या नियमावलीत काय सुरू, काय बंद? 

Updated: Jun 28, 2021, 11:10 AM IST
पुणे शहरात नवी नियमावली जाहीर; काय सुरू, काय बंद? title=

किरण ताजणे, झी मीडिया, पुणे : पुणे शहरात आजपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जाहीर करण्यात आलीय. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावषक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यील सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यांसह पुणे शहरात नेमकं काय सुरू काय बंद राहणार याबाबत अधिक जाणून घेऊया. 

डेल्टा, डेल्टा प्लससारख्या व्हेरिएंटमुळं करोनाचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जुन्या नियमावलीमध्ये बदल केल्यानंतर पुणे महापालिकेनंही सुधारीत आदेश काढले आहेत. त्यानुसार, पुण्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली असून पाच वाजल्यानंतर संचारबंदी असेल. संचारबंदीच्या काळात पुणेकरांना केवळ अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे.

नव्या नियमावलीत काय सुरू, काय बंद? 

- सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यील सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार
- अत्यावश्यक सेवां व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु तर शनिवार रविवार पुर्णपणे बंद
- मॉल्स, सिनेमागृहं संपुर्ण बंद
- रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवाररविवार फक्त पार्सल सेवा ११ पर्यंत
- उद्याने, मैदाने, जॉजींग, रनींग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत
- खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत
- अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने सुरू राहतील 

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे शहराची लेव्हल 3 मध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात आले असून एकाप्रकारे मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता डेल्टा (Delta variant of Coronavirus) आणि डेल्टा प्लस या कोरोना विषाणूने (Delta Plus variant of Coronavirus) सर्वांची चिंता वाढवली आहे.

पुणे शहरात कोरोना प्रतिबंधित नियम पुन्हा कडक करण्यात आले आहे.  पुणे शहराची लेव्हल 3 मध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात आले असून एकाप्रकारे मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.  आज सोमवारपासून शहरात 7 ते 4 वाजेपर्यंतच दुकानं सुरू राहणार आहे.