OBC RESERVATION : 'एकतर ओबीसी आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा'

 राज्यातील महाविकास आघाडी सरकारला देवेंद्र फडणवीसांचा इशारा 

Updated: Jun 28, 2021, 09:52 AM IST
OBC RESERVATION : 'एकतर ओबीसी आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा' title=

नागपूर : ओबीसी आरक्षणासाठी भाजपने राज्यव्यापी आंदोलन केलं होतं. नागपूरमधल्या आंदोलनात बोलतान देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर आरोप केले. 'संपूर्ण देशात ओबीसी आरक्षण कायम असताना केवळ आणि केवळ महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील ओबीसींचे आरक्षण मात्र रद्द झालेले आहे. ( OBC RESERVATION: Either give OBC reservation, or put it under the chair, said Devendra Fadnavis )एकतर ओबीसी आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दिला.

ओबीसी आरक्षणाच्या लढ्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने  राज्यभर हजारो कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी नागपूर येथे सहभाग घेतला. चंद्रशेखर बावनकुळे आणि इतरही नेते त्यांच्यासमवेत उपस्थित होते. 'राज्य सरकारला हे आरक्षण देणे जमत नसेल तर त्यांनी सूत्रे आमच्याकडे सोपवावी. 4 महिन्यांत आरक्षण परत मिळवून नाही दिले', तर राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

कोरोना काळात ( Corona period) आम्हाला गर्दी करण्याचा शौक नाही. सरकार (Maharashtra government) जाग झाले असत तर आम्हाला आंदोलन करावे लागले नसते. राज्य सरकारच्या नाकारतेपणामुळे सरकारला जाग करण्यासाठी गर्दी करण्याची वेळ या सरकारने आमच्या आणली आहे. जे करण्याची वेळ येईल ते-ते आम्ही करणार, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी येथे केले आहे.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा राज्यात चांगला तापला असून भाजपच्यावतीने राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. औरंगाबादेत आकाशवाणी चौकात भाजपने ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन केलं. यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्यात, तब्बल अर्धा तास जालना रोड आंदोलकांनी अडवून धरला. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं...मात्र या आंदोलनामुळे अर्धा तास वाहतूकीचा खोळंबा झाला. भाजप नेत्यांना कार्यकर्त्यांना कोरोनाच्या नियमावलीचा देखील विसर पडलेला दिसला.