पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं आज उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष हजर राहणार आहेत.
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनानंतर 4 ते 6 आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नवीन टर्मिनलवरून विमान उड्डाणं सुरु होतील. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचं काम पूर्ण होऊन अनेक महिने उलटले होते. अखेर आज या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला आहे. पंतप्रधान याचवेळी देशातील अनेक टर्मिनलचंदेखील उद्घाटन करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापूर विमानतळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. कोल्हापूर विमानतळाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभाला ते उपस्थीत राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विमानतळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन सकाळीं 11 वाजता उद्घाटन होणार आहे.
कोल्हापूरसह पुणे, जबलपूर, ग्वाल्हेर विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत उभारली आहे. या कामांचं उद्घाटन 10 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विकास आणि विस्तारीकरणासाठी, खासदार धनंजय महाडिक यांनी विशेष पाठपुरावा केला आहे. त्याला यश आले आणि कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासह सुसज्ज देखणी टर्मिनल इमारत साकारली आहे. येत्या दहा तारखेला याच नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत.
पंतप्रधान मोदी एकाच वेळी ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, कोल्हापूर, जबलपूर, दिल्ली, लखनऊ या विमानतळांवरील नवीन टर्मिनल आणि अलिगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती या विमानतळांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच, वाराणसी, कडप्पा, हुबळी आणि बेळगाव या विमानतळांच्या नवीन टर्मिनलचे भूमिपूजन करणार आहेत. हे प्रकल्प एकूण 12 हजार 700 कोटी रुपयांचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 10 मार्चला दुपारी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीने पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन होईल.
कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल बिल्डिंगचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ हे प्रत्यक्ष विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूरच्या उद्योग, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी कोल्हापुरच्या विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्या अंतर्गत ही नवीन इमारत उभारण्यात आली असून या इमारतीला कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरा ला साजेसे असे दर्शनी रूप देण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूरच्या सौंदर्यात अधिक भर घातली गेली आहे.
कोल्हापूरच्या या विमानतळामध्ये नेमकं काय काय आहे हे पाहुया?