पुण्यातील दर्शना पवार मृ्त्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर

नुकतीच MPSC ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवारचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत राजयगडच्या पायथ्याशी आढळला होता. यानंतर एकच खळबळ उडाली.  आता दर्शनाचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर आला असून यात धक्कादायक खुलासे झाले आहेत. 

निलेश खरमारे | Updated: Jun 19, 2023, 10:58 PM IST
पुण्यातील दर्शना पवार मृ्त्यू प्रकरणाला धक्कादायक वळण,  पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर title=

Pune Crime : पुण्यातील वेल्हा तालुक्यातील रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शना पवार (Darshana Pawar Death Case) या तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दर्शना पवार ही नुकतीच MPSC परीक्षी उत्तीर्ण झाली होती. सत्कारासाठी ती पुण्यात (Pune) आली पण गेल्या आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. तेव्हापासून तिचा काहीही कुटुंबियांशी कोणताही संपर्क झालेला नव्हता. 15 जूनला सिंहगड रोडच्या (Sinhagad Road) नऱ्हे पोलीस स्टेशन मध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती 18 जूनला तीचा मृतदेह आढळला. 

पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
दर्शना पवारचा मृतदेह पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी (Postmortem Report) पाठवण्यात आला होता. हा रिपोर्ट आता समोर आला असून यात धक्कादायक खुलासे झाले आहेत. दर्शना पवारच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या असून यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आला आहे. यामुळे आता पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वेल्हा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा दाखल झाला आहे. दर्शनाच्या मित्रावर संशयाची सूई असून तो देखील बेपत्ता आहे. त्याच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 पथकं तयार केली आहेत. 

राजगडवर फिरण्यासाठी आली होती दर्शना
दर्शना पवार ही नुकतीच वन खात्याची आरएफओ परीक्षा उत्तीर्ण झाली होती. 9 जूनला पुण्यातील स्पॉट लाईट अॅकॅडमी (Spot Light Academy) इथं तिचा सत्कार होणार होता. त्यानंतर 11 जूनपर्यंत ती कुटुंबाच्या संपर्कात होती. पण 12 जूनपासून कुटुंबाचा तिच्याशी काहीह संपर्क झाला नाही. त्यामुळे चिंतेत असलेल्या पालकांनी पुण्यात स्पॉट लाईच अॅकॅडमी इथं येऊन तिच्याबद्दल चौकशी केली. त्यामुळे दर्शना पवार ही मित्र राहुल हांडोरे याच्यासोबत राजगडवर फिरण्यासाठी गेली असल्याची माहिती मिळाली. पण दिवस उलटून गेल्यानंतरही त्यांचा संपर्क होत नसल्याने कुटुंबियांनी सिंहगड रोड परिसरात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुासर राहुल हांडोरे हा नाशिक जिल्ह्यातला आहे. तर दर्शना ही अहमदनगर जिल्ह्यातील आहे. दोघंही ट्रेकिंगला गेले होते. पण त्यादिवसानंतर दोघंही बेपत्ता झाले. 8 दिवसांनंतर दर्शना पवारचा मृतदेह आढळून आला असून राहुल बेपत्ता आहे. त्यामुळे राहुल यानेच दर्शनाची हत्या केली की आणखी कोणी यामागे आहे याचा तपास पोलीस करत आहेत.