Pune News : उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसाय; पोलिसांना माहिती मिळाली अन्...

Pune Crime : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली असून उच्चभ्रू समजला जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात सदनिकेत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Feb 17, 2024, 09:54 AM IST
Pune News  : उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसाय; पोलिसांना माहिती मिळाली अन्... title=
pune Crime news prostitution started in the elite koregaon park thailand woman arrested

Pune Crime : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू परिसरात पुन्हा एकदा वेश्या व्यवसायचा सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उच्चभ्रू समजला जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरातील एका इमारतीत बेकायदा वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे. स्पामध्ये काम करण्याच्या नावाखाली थायलंडमधील दोन तरुणींना पुण्यात आणण्यात आलं. त्यानंतर त्या मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याच आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी थायलंडमधील दोन तरुणींना ताब्यात घेतले असून एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला आहे. (pune Crime news prostitution started in the elite koregaon park thailand woman arrested)

याप्रकरणी पोलीस हवालदार रईसा बेग यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली त्यावरून महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्कमधील एका इमारतीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यावेळी आरोपी पीडित तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे सत्य समोर आलं. आरोपी महिला ही मूळची थायलंडमधील असून तिने कोरेगाव पार्कमधील एका सोसायटीत घर भाडेतत्त्वावर घेतलं होतं. महिलेने थायलंडमधील दोन तरुणींना स्पामध्ये काम देण्याच्या आमिषाने पुण्यात आणलं होतं. 

पुण्यातील ही पहिलच घटना नसून यापूर्वीही कोरेगाव पार्क परिसरात जानेवारी महिन्यात अशीच घटना समोर आली होती. त्या घटनेत उजबेकिस्तान आणि राजस्थान मधील दोन युट्यूब अभिनेत्रींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पुणे पोलिसांनी शहरात हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचा भांडाफोड केला होता. ऑनलाइन वेश्या व्यवसायासाठी करुन ही टोळी पुण्यात कार्यरित होती. दरम्यान तरीहीदेखील पुणे पोलिसांची डोकेदुखी थांबत नाही आहे.