पुणे : जळत्या सरणावरुन बाजूला फेकला वृद्ध महिलेचा मृतदेह; धक्कादायक कारण समोर

निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या भोर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळत्या सरणावरचा वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी आवारात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार भोर तालुक्यातील बालवडी गावत घडलाय. स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचा समोर आलय. या घटनेनंतर गावात संतापाचे वातावरण असून हे खबळबजनक कृत्य करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

अक्षरशः वृद्ध महिलेचा मृतदेह जळत असताना मृतदेह बाहेर काढून फेकून देण्यात आला आहे. रविवारी रात्री अत्यंविधी उरकून नातेवाईक घरी परतल्यानंतर नेरे गावातील प्रकाश सदाशिव बढे या संशयित व्यक्तीने स्मशानभूमीमध्ये जात हा प्रकार केलाय. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार करताना संबधित व्यक्तीला बघितल्यानं ही घटना उघडकिस आलीय. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीला मारहाण करत, त्याचं हॉटेल जाळलंयं. 

त्यामुळं या घेटनेनंतर गावात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून ही तणाव परिस्थिती नियंत्रणात आणली. या विचित्र घटनेत मृतदेहाच्या झालेल्या हेळसांड झाल्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त होतेय. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्याचं कामं सुरू आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Pune Crime News old woman body was thrown in the crematorium premises
News Source: 
Home Title: 

पुणे : जळत्या सरणावरुन बाजूला फेकला वृद्ध महिलेचा मृतदेह; धक्कादायक कारण समोर

पुणे : जळत्या सरणावरुन बाजूला फेकला वृद्ध महिलेचा मृतदेह; धक्कादायक कारण समोर
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Nilesh Kharmare
Mobile Title: 
पुणे : जळत्या सरणावरुन बाजूला फेकला वृद्ध महिलेचा मृतदेह; धक्कादायक कारण समोर
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, March 25, 2024 - 09:16
Created By: 
Akash Netke
Updated By: 
Akash Netke
Published By: 
Akash Netke
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
151