पुणे हादरलं: जुना राग मनात ठेवून ओल्या पार्टीला बोलावलं, मग Live Stream करून केला ‘गेम’

Pune Crime News : पुण्यात जुन्या वादातून दोन अल्पवयीन मुलांनी एका युवकाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अल्पवयीन मुलांनी या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ शूट केला होता.

आकाश नेटके | Updated: Feb 29, 2024, 02:14 PM IST
पुणे हादरलं: जुना राग मनात ठेवून ओल्या पार्टीला बोलावलं, मग Live Stream करून केला ‘गेम’ title=

हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. अशातच आजूबाजूच्या परिसरात असलेल्या चाकणमध्येही गुन्हेगारी वाढल्याचे समोर आलं आहे. अल्पवयीन मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. अशातच जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका युवकाचा खून करण्यायात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपींनी या हत्येचा व्हिडीओ देखील शूट केला. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

आपल्याच मित्राचा डोक्यात दगड घालून निघृणपणे खून करून त्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खेड तालुक्यातील चाकण येथे हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. चाकण-आंबेठाण रस्त्यालगत असणार्या सौंदर्य सोसायटी जवळच्या मोकळ्या जागेत मृत तरुणाच्या दोन अल्पवयीन मित्रांनीच त्याचा निर्घृण खून केला. त्यानंतर दोघांनी याचा व्हिडीओ शूट केला. शेवटी एकाने पुन्हा मृत तरुणाच्या डोक्यात दगड घातला. खून करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपी आणि मृतांमध्ये दोन वर्षापूर्वी भांडण झाले होते. त्याच भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मृत मुलाला सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास चाकण आंबेठाण रस्त्यावर सौंदर्य सोसायटीच्या समोरील मोकळ्या जागेत नेले. त्यावेळी आरोपींनी मुलाच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर दगड घालून त्याला ठार मारण्यात आले. या सगळ्या प्रकारानंतर आरोपी मुलांनी या हत्येचे मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. त्यानंतर यातील एका आरोपीने कॅमेऱ्याच्या समोर येऊन आपण खून केल्याचे सांगितले. त्यानंतर हा व्हिडीओ आरोपींनी आपल्या स्टेटसवर ठेवत दहशत पसरवण्यासाठी ठेवला.

आरोपींच्या स्टेटसला ठेवण्यात आलेला हा व्हिडीओ मृत मुलाच्या काही मित्रांनी त्याच्या घरच्यांना दाखवला. त्यानंतर त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी दगडाने ठेचलेला मुलाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तात्काळ दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चाकण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.