Crime News : मित्रानेच कापला केसाने गळा; बहिणीच्या मदतीने मित्राच्या बायकोवर केला अत्याचार

Crime News : महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. महिलेनी सांगितलेली हकीकत ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या बहिणीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Updated: Jan 27, 2023, 02:04 PM IST
Crime News : मित्रानेच कापला केसाने गळा; बहिणीच्या मदतीने मित्राच्या बायकोवर केला अत्याचार title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : मित्राच्या पत्नीला ब्लॅकमेल (Blackmail) करत तिच्यावर बलात्कार (Sexual assault) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime News) समोर आला आहे. पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हे सर्व प्रकरण उजेडात आले. महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर अनेक खळबळजनक खुलासे समोर आले आहेत. या कृत्यामध्ये आरोपीच्या बहिणीनेही त्याची साथ दिली होती. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (Pune Police) बहिण भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पतीच्या मित्राने अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर ब्लॅकमेल करत पतीच्या मित्राने बलात्कार केला, अशी तक्रार पीडित महिलेने दिली आहे. तसेच मला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी जबरदस्ती देखील केली, असेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पुण्यातील चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघा बहीण भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साजिद मोहम्मद अली कुंजू (वय 39) आणि हसीना अशी या बहिण भावांची नावे असल्याचे समोर आले आहे. यातील साजिद याला अटक करण्यात आली आहे. 2021 पासून वेळोवेळी हा प्रकार घडत होता. अखेर 39 वर्षीय पीडित विवाहित महिलेने याप्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

आरोपी साजिद हा तक्रारदार महिलेच्या पतीचा मित्र आहे. आरोपीने महिलेच्या मोबाईलवर फोन करून "तू मला खूप आवडतेस, तू मला खुश कर, माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, माझ्यासोबत मैत्री कर असे म्हटले होते. जर असे केले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही साजिदने दिली. साजिदने महिलेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर पाठवून तुझी भर रस्त्यात बदनामी करेल अशी धमकी दिली होती. तसेच तुझ्या तोंडावर ॲसिड टाकून तुझा चेहरा विद्रूप करेल, तुझ्या मुलाचे अपहरण करेन अशा धमक्या देत माझ्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्या जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

आरोपीच्या बहिणीचाही सहभाग

साजिदच्या बहिणीने या कृत्यामध्ये त्याची साथ देत महिलेचा छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. साजिदची बहिणी तक्रारदार महिलेला वारंवार फोन करून पैशाची मागणी करत होती. तसेच माझ्या भावासोबत लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहा अशीही धमकी दिली होती. दरम्यान, चंदननगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू आहे.