प्रेमभंग झाल्याने प्रेयसीच्याच घरी दरोडा, धडा शिकवण्याच्या नादात जेलमध्ये गेला

यूट्यूबचा नाद, पुण्यातला प्रियकर बरबाद 

Updated: Oct 8, 2022, 08:13 PM IST
प्रेमभंग झाल्याने प्रेयसीच्याच घरी दरोडा, धडा शिकवण्याच्या नादात जेलमध्ये गेला  title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे :  ब्रेकअप झालं म्हणून कट रचत प्रियकरानं चक्क प्रेयसीच्याच घरात चोरी केली. पुण्यात  (Pune) हा धक्कादायक प्रकार घडलाय. विशेष म्हणजे यूट्यूबवर व्हिडीओ (Youtube Video) पाहून प्रियकरानं चोरीचा कट रचला. आंबेगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत सुमीत परदेशीचे प्रेमसंबंध होते. 

पण मागच्या काही दिवसात त्यांच्यात बिनसलं. प्रेयसी दुसऱ्या कुणाशी तरी बोलत असल्याचं लक्षात येताच सुमीत संतापला. प्रेमभंगामुळे संतापलेल्या सुमीतनं धडा शिकवण्यासाठी प्रेयसीच्या घरात दरोडा घातला. चोरीचा प्रकार लक्षात येताच प्रेयसीनं विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासलं आणि सुमीतचं बिंग फुटलं. सुमीतकडून 14 लाख रुपयांचे दागिने आणि परकीय चलन जप्त करण्यात आलंय.

यूट्युब पाहून प्रेमात पडणारे अनेक असतील. पण यूट्यूब पाहून प्रेयसीचा बदला घेण्यासाठी कट रचणाऱ्या सुमीत परदेशीचा हे पाऊल खरंच धक्कादायक आहे. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे वाढलेली गुन्हेगारी पोलिसांसमोरील मोठं आव्हान आहे.