पुण्यात 15 वर्षीय कॉलेज तरुणीवर मित्रांकडून गँगरेप! मुळा नदीच्या पत्रातील झाडीत नेलं अन्..

Pune Gang Rape Crime News: आपण कुठेतरी फिरायला जाऊ असं म्हणत हे दोघेजण त्या दोघींना घेऊन पुण्यातील मुळा नदीच्या पत्रामध्ये घेऊन गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलीने कुटुंबियांच्या मदतीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 31, 2024, 10:36 AM IST
पुण्यात 15 वर्षीय कॉलेज तरुणीवर मित्रांकडून गँगरेप! मुळा नदीच्या पत्रातील झाडीत नेलं अन्.. title=
पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली आहे

Pune Gang Rape Crime News: पुण्यातील मांजरी येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका अल्पवयीन तरुणीवर दोघांनी बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

मित्रांनीच केला बलात्कार

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही 15 वर्षांची आहे. या तरुणीला तिचे मित्र फिरण्याच्या बहाण्याने मुळा नदीच्या पत्रात घेऊन गेले. या ठिकाणी या दोघांनाही आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. या दुष्कृत्यानंतर हे दोघेही या तरुणीला तिथेच सोडून पळून गेले. 

आरोपींचं वय 21 आणि 21

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने बलात्काराचा गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी उपाचारासाठी या तरुणीला रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. वैद्यकीय चाचण्यांनंतर या तरुणीवर बलात्कार झाल्याच्या दाव्याला दुजोरा मिळू शकतो आणि हाच अहवाल आरोपींविरोधात पुरावा म्हणून सादर करता येणार आहे. आनंदनगर केशवनगर मुंढवा येथे राहणारा 21 वर्षीय अनुराग साळवे तसेच मुंढाव्यातीलच शिंदे वस्तीत राहणाऱ्या 23 वर्षीय गणेश म्हेत्रेला पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे.

फिरायला जाऊ म्हणत घेऊन गेले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आणि मैत्रीण आरोपींबरोबर फिरायला गेले होते. या दोघींना सोमवारी सायंकाळच्या सुमारास आरोपी अनुराग साळवे, गणेश म्हेत्रेने, आपण कुठे तरी फिरायला जाऊ असं सांगत घेऊन गेले. त्यानंतर चौघेजण मांजरी येथील नदीपात्रालगत असलेल्या झाडीत घेऊन गेले. आरोपी अनुराग साळवी आणि गणेश म्हेत्रे या दोघांनी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. दोघांनाही मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिला आणि तिच्या मैत्रीणीला तिथे सोडून घटनास्थळावरुन पळ काढला. मानसिक धक्का बसलेल्या अवस्थेत पीडितेला तिच्या मैत्रिणीने घरी नेलं.

अधिक चौकशी सुरु

या घडलेल्या प्रकाराबाबत पीडित मुलीने घरच्या मंडळींना सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर पीडित मुलीने आमच्याकडे तक्रार देताच, दोन्ही आरोपींना अटक केली असून आरोपी अनुराग साळवी आणि गणेश म्हेत्रे यांच्याकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.