Pune Crime: विद्येच्या माहेरघरात हे काय चाललंय? खडकवासला धरणात मृतदेह पाहून पुणेकरांमध्ये खळबळ

Pune Crime: पुण्यामध्ये नदीमध्ये मृतदेह सापडण्याची घटनांमध्ये वाढ होताना पहायला मिळत आहे. त्यातच खडकवासला (Khadkwasala) धरणाच्या पाण्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. 

Updated: Feb 10, 2023, 03:36 PM IST
Pune Crime: विद्येच्या माहेरघरात हे काय चाललंय? खडकवासला धरणात मृतदेह पाहून पुणेकरांमध्ये खळबळ title=

Pune Crime: पुण्यामध्ये सध्या विविध प्रकारचे गुन्हे होताना पाहायला मिळत आहेत. त्यातून खून प्रकरणेही (Pune crime news) वाढताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सध्या अशाच एका घटनेनं पुन्हा सगळीकडेच खळबळ उडाली आहे. खडकवासला धरण येथे एक मृतदेह मिळाला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा मृतदेह वाहून येथे आला असल्याचे समजते आहे. त्याचा तपास अद्यापही सुरू आहे. (pune crime a dead body found in khadkwalsa pune citizens get shocked)

पुण्यामध्ये नदीमध्ये मृतदेह सापडण्याची घटनांमध्ये वाढ होताना पहायला मिळत आहे. त्यातच खडकवासला (Khadkwasala) धरणाच्या पाण्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. पुरुष जातीचा हा मृतदेह असून त्याचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष इतके आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्याच्या कुडजे गावच्या हद्दीत हा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आक्समात मृत्यूची नोंद केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या एनडीए परिसरात असणाऱ्या कुडजे गावच्या हद्दीत काही नागरिक या पाण्याच्या परिसरातून जात होते. जात असताना त्यांना खडकवासला धरणाच्या पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. त्यातून त्यांना वेगळा संशय आला. त्यामुळे त्यांनी काही वेळ त्याच निरीक्षण करत खात्री करून घेतली. मृतदेह (Dead Body Found) असल्याची खात्री पटल्याने त्यांनी पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांना याबाबत माहिती दिली. जवानांनी नौदनाच्या बोटीच्या सहायाने हा मृतदेह बाहेर काढला आहे. मृतदेहाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचे काम सुरू असून लवकरच त्याची माहिती समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मृतदेह ज्या ठिकाणी सापडला आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतीही जागा उपलब्ध नाही. कदाचित हा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहून आला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. कारण मृतदेह जेथे आढळला त्या परिसरात मृतदेहाचे कोणतेही कपडे अथवा कोणतीही वस्तू आढळलेली नाही. पोलिसांनी खडकवासला धरण परिसरातील आजूबाजूच्या गावात चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

सध्या अशा घटना बऱ्याच घटना घडताना दिसत आहेत. त्यातून वाढती गुन्हेगारीही नागरिकांचा संताप वाढते आहे. त्यातून पुण्यात कोयता गॅंगसारख्या (Koyta Gang) लोकांनी सगळीकडेच दहशत माजवली आहे. सध्या अशा घटनांना आळा घालणंही तितकेच महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांनी याकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे.