पुणे : पुण्यात हेल्मेटसक्ती आहे की नाही, यावरुन दिवसभर बराच गदारोळ आणि गोंधळ झाला. पुण्याच्या आमदारांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हेल्मेटसक्तीला स्थगिती दिल्याचं बिनदिक्कत सांगण्यात आलं पण पुण्याच्या आमदारांना आम्ही मुख्यमंत्र्यांचा बाईट ऐकवल्यावर गडबड झाली. पुणेकरांचा बाणा कायम असल्यामुळे हेल्मेटसक्ती कायम असली तरी कारवाईचं स्वरुप बदलण्यात आलं आहे.
पुण्यातल्या हेल्मेटसक्तीला स्थगिती देण्यात आलेली नाही. पुण्यामध्ये हेल्मेट न घालता दुचाकी चालवली तर कारवाईही होणार आहे. पण हेल्मेट नसेल तर रस्त्यामध्ये वाहतूक पोलीस अडवणार नाहीत. पण सीसीटीव्हीच्या माध्यमातून नोंद होणार आणि दंडाची पावती घरी येणार आहे.
थोडक्यात काय ? तर, हेल्मेटसक्ती तशीच आहे, फक्त रस्त्यात अडवून दंड वसूल होणार नाही, घरी पावती येईल आणि दंड वसूल केला जाईल. म्हणजेच काय तर डोक्यावर हेल्मेट आणि खिशात पैसे नसले तरी प्रवास करु शकाल, आपल्याला कोण अडवणार?, या टेचातही प्रवास करु शकाल. पण घरी चालान येतंय का, त्यावर लक्ष ठेवा.