'कैद्यांना सोडा अन्यथा...', पाकिस्तानवरुन पुणे पोलिसांना बॉम्ब ठेवल्याचा मेसेज

Pune Crime News Marathi : नवी पेठेतील पूना रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकी देणारा फोन गुरुवारी (1 फेब्रुवारी) रात्री उशीरा पोलिस नियंत्रण कक्षात आला. या कॉलनंतर पुणे पोलिसांनी तातडीने पूना हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 3, 2024, 12:15 PM IST
'कैद्यांना सोडा अन्यथा...', पाकिस्तानवरुन पुणे पोलिसांना बॉम्ब ठेवल्याचा मेसेज title=

Bomb Threat At Poona Hospital: पुण्यातील बड्या हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या फोननंतर एकच खळबळ उडाली होती.  नवी पेठेतील पूना हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री उशीर पोलिस नियंत्रण कक्षात बॉम्ब ठेवल्याची धमकी आली. या अज्ञात कॉलनंतर पुणे पोलिसांनी तातडीने पूना हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. या फोननंतर पुणे रुग्णालयाबाहेर पोलीसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र आता हा अज्ञात फोन कुठून आला होता याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.  

पूना रुग्णालयात बॉम्ब ठेवल्यात आल्याचा फोन रात्री नियंत्रण कक्षात आला. याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्यात देण्यात आली. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बीडीडीएस पथक घटनास्थळी दाखल झाले. बीडीडीएस पथक आणि पोलिस मध्यरात्रीपर्यंत रुग्णालय परिसरात शोधकार्य सुरू होते. गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी रुग्णालयाची तपासणी देखील केली. मात्र यामध्ये कोणतीही बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याची अफवा अज्ञातांनी पसरवली होती अशी शक्यता होती. मात्र या अज्ञात नंबरचा शोध लावला असता हा नंबर पाकिस्ताचा असल्याते सिद्ध झाले आहे. 

पाकिस्तानी कैद्यांची सुटका करा, अन्यथा आम्ही पूना हॉस्पिटल बॉम्बने उडवून देऊ.., असा मेसेज पोलिसांना आल्यानंतर पोलिस यंत्रणा ‘ॲक्शन मोड’ वर आली. यावेळी  पोलीस, अग्निशमन दल आणि बॉम्ब निकामी पथक (बीडीडीएस) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णालयाच्या आवारात धाव घेतली. रुग्णालयात कोणत्याही प्रकारचे बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही, मात्र या प्रकारामुळे पुणे परिसरात मोठी घबराट उडाली होती.  गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला पाकिस्तानी क्रमांकावरून संदेश आला. त्यानंतर पोलीस यंत्रणेने मोठी धावपळ उडाली. विश्रामबाग आणि डेक्कन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान बॉम्ब शोधक पथकाने पूना हॉस्पिटलचे मेडिकल, पार्किंग, प्रत्येक खोली आणि संशयास्पद वस्तूंची कसून तपासणी केली. तब्बल दोन तास पाहणी केल्यावर कोणतीही बॉम्ब सदृश वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.

पुण्याप्रमाणेच मुंबईतही 6 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा संदेश मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला आला आहे. हा प्रकार खोडसाळपणातून झाल्याची शक्यता असून, पोलिस नियंत्रण कक्षाला मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.  बॉम्बच्या या अफवेमुळे शहरामध्ये घाबराटीचे वातावरण निर्माण झाले.