पुणे : पुण्यातील बीपीओ कर्मचारी ज्योती कुमारी बलात्कार आणि हत्येप्रकरणातल्या दोघा दोषींना २४ जूनला फाशी देण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर २००७ मध्ये ज्योतीकुमार चौधरी या बीपीओ कर्मचारी महिलेवर बलात्कार करून खून करण्यात आला होता. ज्योती मुळची गोरखपूरची होती. ऑफिसमध्ये जाण्यासाठी कंपनीच्या गाडीत ती बसली. गाडीतल्या पुरुषोत्तम बोराडे आणि प्रदीप कोकडे या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला आणि मग तिचा खून केला. ज्योतीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी गहुंजेत आढळला.
सर्वोच्च न्यायालयाने ८ मे २०१५ या दिवशी या दोघांच्या फाशीवर शिक्कामोर्तब केलं होतं. यानंतर या दोघांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर केला होता. पण राष्ट्रपतींनी या दोघांच्या दयेचा अर्ज फेटळाला. सध्या हे दोघेही पुण्यात येरवडा कारागृहात आहेत. कारागृहाच्या मुख्याधिकाऱ्याला फाशीची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आलेत. ३० जुलै २०१५ ला राज्यात याकूब मेमनला फाशी देण्यात आली होती. त्यानंतर राज्यात या दोघांना फाशी देण्यात येणार आहे.