पुणे : पुण्यात वाढते रुग्ण पाहता वैद्यकीय सुविधा वाढवल्या पाहिजेत,बेड व्हेंटिलेटर वाढले पाहिजेत अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केलीय. प्रशासन तीन जम्बो हॉस्पिटल बांधणार त्याला वेळ जाईल,मात्र त्यामूळे आहे त्या हॉस्पिटलमध्ये बेड वाढवले पाहिजेत असे ते म्हणाले.
पीपीइ किट, औषधे इतर साहित्य खासगी रुग्णालयाला द्यावे, यामुळे रुग्णाला बिल कमी येईल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
टेस्ट वाढवली पाहिजेत. महापालिकेला जम्बो हॉस्पिटल बांधण्यासाठी पैसे देणं अवघड आहे पण महापालिकेने पैसे द्यावेत असे पाटील म्हणाले.
जरी उद्या सरकार आलं आमचं तरी येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्व निवडणूक स्वबळावर भाजप स्वबळावर लढणार असे पाटील यावेळी म्हणाले. महापालिका जम्बो हॉस्पिटल बांधण्यासाठी सरकारला पैसे देईल,सरकारनेही महापालिकेच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन पुण्याच्या महापौरांनी केलंय.
खाजगी हॉस्पिटलबाबत सरकारने असे आदेश दिले तरीही बेड ताब्यात नाहीत,त्यांना कडक आदेश दिले पाहिजेत,ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची कमतरता असल्याचे ते म्हणाले.