Pune Crime News : पुण्यात मर्सिडीज बेंझ खाली चिरडून 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. येरवडा भागात (Yerwada Accident) असणाऱ्या गोल्फ कोर्स जवळ हा अपघात घडला. आलिशान गाडीखाली येऊन दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. नंदू अर्जुन ढवळे नावाच्या चालकाने दुचाकीस्वाराला धडक दिली. केदार मोहन चव्हाण असं मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात ही घटना घडली. सध्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Video) मदतीने प्रकरणाची चौकशी सुरू केलीये.
चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दुचाकीचालकाला वैद्यकीय तपासणीसाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस (Pune Mercedes car Accident) ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकातून केदार चव्हाण हे दुचाकीनी जात होते. यावेळी दुचाकी स्लिप झाल्याने केदार चव्हाण रस्त्यावर कोसळले. याचवेळी पाठीमागून येणारी मर्सिडीज बेंज गाडी त्यांच्या अंगावर गेली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजतात येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी कारचालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
कल्याणीनगरमध्ये दोघांना रस्त्यावर चिडून मारल्यानंतर पुण्यामध्ये गेल्या 25 दिवसांमध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे. गेल्या 25 दिवसांमध्ये झाले आहेत. त्यामध्ये 31 जणांचा निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. इतकेच नव्हे तर 54 जण गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामुळे आता पुण्यात नेमकं चाललंय काय? असा सवाल विचारला जात आहे.