मोठी बातमी : बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले, आक्षेपार्ह विधान भोवले

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले सातारा पोलिसांना हे निर्देश

Updated: Feb 4, 2022, 12:46 PM IST
मोठी बातमी : बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले, आक्षेपार्ह विधान भोवले title=

सातारा कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येथे त्यांची चौकशी करून नंतर त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाची राज्य महिला आयोगाने दाखल घेतली आहे. बंडातात्या यांचे विधान संतापजनक असून महिलांच्या आत्मसन्माला धक्का बसला आहे.

दरम्यान, सातारा शहर पोलिसांनी याची दखल घेऊन कडक कारवाई करावी. तसेच याचा अहवाल दोन दिवसात राज्य महिला आयोगाला सादर  करावा असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

काल साताऱ्यात वाईन विक्री निर्णयाविरोधात वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी आंदोलन केले. यावेळी त्यांनी खा. सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले.

बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या आंदोलनामुळे सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परवानगी नसताना बेकायदेशीर आंदोलन करणे, कोविडचे नियम न पाळणे, मास्कबाबत वेगळी चिथावणी देणे या कलमांखाली बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, भडकाऊ भाषण केल्याचीही नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

राज्य महिला आयोगाने बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या विधानामुळे महिलांच्या आत्मसन्माला धक्का बसला आहे. सातारा शहर पोलिसांनी याची दखल घेऊन कडक कारवाई करावी. तसेच याचा अहवाल दोन दिवसात राज्य महिला आयोगाला सादर  करावा. त्याचप्रमाणे  बंडातात्या यांनी याबाबतचा लेखी खुलासा ४८ तासात राज्य महिला आयोगाला द्यावा असे निर्देश दिले आहेत.