मराठा आरक्षणासाठी आंदोलन, सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी

सोलापूर जिल्ह्यात अजूनही काही ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरूच आहे. शहर आणि जिल्ह्यात बऱ्याच ठिकणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आज आयोजित जेल भरो आंदोलन मागे घेतलं आहे. मात्र सोलापूर पुणे महामार्गावर कोंडीजवळ उत्तर सोलापूर सकल मराठा मोर्चाने चक्का जाम आंदोलन करून निषेध नोंदवला. 

Updated: Aug 1, 2018, 01:53 PM IST
मराठा आरक्षणासाठी आंदोलन, सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी title=

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अजूनही काही ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरूच आहे. शहर आणि जिल्ह्यात बऱ्याच ठिकणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आज आयोजित जेल भरो आंदोलन मागे घेतलं आहे. मात्र सोलापूर पुणे महामार्गावर कोंडीजवळ उत्तर सोलापूर सकल मराठा मोर्चाने चक्का जाम आंदोलन करून निषेध नोंदवला. 

दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे पुणे सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला होता. वाहतूक ठप्प असल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दोन तास आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.