कामोत्तेजनेसाठी आयुर्वेदीक गोळ्या घेता? सावधान!

प्रशासनाने केलेल्या कारवाईवेळी पॉवर अप कॅप्सूल आणि किंग क्रिम या औषधांमध्ये या मात्रा आढळल्याने ही दोन्ही औषधे जप्त करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Updated: Aug 1, 2018, 12:47 PM IST
कामोत्तेजनेसाठी आयुर्वेदीक गोळ्या घेता? सावधान! title=

औरंगाबाद: तुम्ही तुमची सेक्स पॉवर वाढविण्यासाठी आयुर्वेदीक गोळ्यांचा वापर करता? करत असाल तर सावधान! या गोळ्या तुम्ही आयुर्वेदीक म्हणून जरी घेत असाल तरी, त्यात व्हायग्रा आणि गुंगीच्या औषधांची मात्रा असू शकते. औरंगाबादच्या अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईत नुकत्याच एका रॅकेटचा पर्दाफाश झाला. हे रॅकेट सेक्स पॉवर वाढविणाऱ्या औयुर्वेदीक गोळ्यांमध्ये व्हायग्रा आणि गुगींचे औषध मिसळत असे. दरम्यान, प्रशासनाने केलेल्या कारवाईवेळी पॉवर अप कॅप्सूल आणि किंग क्रिम या औषधांमध्ये या मात्रा आढळल्याने ही दोन्ही औषधे जप्त करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

पॉवर अप कॅप्सूल आणि किंग क्रिम या दोन्ही औषधांच्या कंटेनरमध्ये सिल्डेनफिल आणि गुंगी आणणाऱ्या अॅलिओपॅथिक घटक आढळून आले. महत्त्वाचे म्हणजे या औषधांमध्ये अशा प्रकारचे घटक असल्याची कोणतीही माहिती औषधांवर देण्यात आली नव्हती. त्यामुळे आपण घेत असलेल्या आयुर्वेदीक गोळ्यांमध्ये आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या या घटकांचा समावेश आहे. याची कोणतीही कल्पना ही औषधे घेणाऱ्यांना मिळत नसे. त्यामुळे ही बाब अन्न व औषध प्रशासन विभागाने गंभीरपणे घेतली आहे. याप्रकरणी यूपी येथील नमन इंडिया या मॅनीफॅक्चरर कंपनीवर एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचं एफडीआयने म्हटले आहे.

दरम्यान, एफडीने काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद येथील सृष्टी मेडिसिन युनानी एजन्सीवर धाड मारली. यावेळी या एजन्सीकडून सुमारे १६ हजार रूपये किमतीचा व्हायग्राचा माल जप्त करण्यात आला. हा माल उत्तर प्रदेशातील सगहानपूर येथून आणला होता. पकडण्यात आलेल्या पॉवर अप कॅप्सूलचे परीक्षण करण्यात आले. या परीक्षणात व्हायग्राची ४९.४५ मिली ग्रॅम मात्रा आढळून आली. तर टागर किंग क्रिममध्ये लिग्नोकेन हायड्रोक्लोराइडची मात्रा मोठ्या प्रमाणावर आढळून आली होती. महत्त्वाचे म्हणजे, औषधांच्या पॅकींगवर केवळ हार्बल घटकांचाचा उल्लेख होता.

एफडीएने याच महिन्यात औरंगाबादच्या सृष्टी मेडिसिन युनानी एजन्सीवर धाड मारली होती. त्यावेळी व्हियाग्राचा एकूण १६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून हा माल आणला होता. पॉवर अप कॅप्सूलचे परीक्षण करण्यात आल्यानंतर त्यात व्हियाग्राची ४९.४५ मिली ग्रॅम मात्रा आढळून आली. तर टागर किंग क्रिममध्ये लिग्नोकेन हायड्रोक्लोराइडची मात्रा मोठ्या प्रमाणावर आढळून आली होती. विशेष म्हणजे या पॅकींगवर केवळ औषधांमध्ये हार्बल घटकांचाच उल्लेख करण्यात आला होता.