पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील समस्या

मतदारसंघात स्वच्छतेचे तीनतेरा वाजलेले आहेत.

Updated: Jun 20, 2018, 07:10 AM IST
पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील समस्या title=

जावेद मुलाणी, झी मीडिया, बारामती : बारामती लोकसभेत मोडणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ बारामती शहराचा विकास झाला... मात्र इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, खडकवासला या अन्य मतदारसंघांमध्ये म्हणावी तशी विकासकामं झालेली नाहीत. पुरंदर तालुक्यामधील  औद्योगिक वसाहत असो की इंदापूरमधल्या लोणी देवकरची पंचतारांकित औद्योगिक वसाहत असो. बारामतीप्रमाणे मोठे उद्योग या भागात आलेच नाहीत..दौंड येथील बहुचर्चित नगर मोरीचा प्रश्नही प्रलंबित आहे. मतदारसंघात स्वच्छतेचे तीनतेरा वाजलेले आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक शिक्षण संस्था आहेत... मात्र इथं शिक्षण घेतलेल्यांना रोजगारासाठी मात्र अन्यत्र जावं लागतंय... औद्योगिक वसाहतींचा विकास न झाल्यानं बेजोरगारीचा प्रश्न मोठा आहे.  पिण्याच्या पाण्याची समस्याही अद्याप कायम आहे. 

खासदार सुप्रिया सुळे अलीकडच्या काळात मतदारसंघासाठी वेळ देतायत. मात्र अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. मात्र आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपण निश्चित निवडून येऊ, असा सुळे यांचा दावा आहे. 

दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडे मोठा उमेदवार नाही. त्यामुळे पुढल्या वर्षीही पुन्हा एकदा रासपचे संस्थापक आणि राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकरच निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 

बारामतीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार असली तरी आपल्यासाठी प्रतिष्ठेचा असलेला हा मतदारसंघ राखणं राष्ट्रवादीसाठी आवश्यक आहे.