पृथ्वीराज चव्हाण यांना भाजप देणार दे धक्का?

 माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील यांनी  फडणवीस यांची भेट घेतली आहे.  

Updated: Sep 10, 2019, 12:36 PM IST
पृथ्वीराज चव्हाण यांना भाजप देणार दे धक्का? title=

सातारा : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आणि सातारा जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यामुळे ते लवकरच भाजपमध्ये जाणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. कराडचे भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत तब्बल २० मिनिटे मुख्यमंत्रांसोबत आनंदराव पाटील यांनी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

आनंदराव पाटील भाजपमध्ये गेल्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसणार आहे. कारण काँग्रेसच्या राजवटीत पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आनंदराव पाटील हे शॅडो मुख्यमंत्री म्हणून जिल्ह्यात काम करायचे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी फारकत घेतल्याचे जाणवत होते. आनंदराव पाटील भाजपमध्ये गेल्यास ऐन विधानसभेच्या तोंडावर पृथ्वीराज चव्हाण यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल.