पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर, मेट्रोसह विविध विकासकामांचे उदघाटन

PM Narendra Modi’s visit to Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते पुणेकरांना मेट्रो ( Pune Metro) गिफ्ट मिळेल. 

Updated: Mar 6, 2022, 08:37 AM IST
पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर, मेट्रोसह विविध विकासकामांचे उदघाटन title=
संग्रहित छाया

पुणे : PM Narendra Modi’s visit to Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते पुणेकरांना मेट्रो ( Pune Metro) गिफ्ट मिळेल. गरवारे कॉलेज ते आनंद नगर मेट्रो जंक्शन मेट्रोसह विविध विकासकामांचं उदघाटन, भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. 

महापालिका निवडणूक पुढील महिन्यात असल्याने भाजप या निमित्ताने मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे. तर राष्ट्रवादीने मोदींच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर मोदींच्या दौऱ्यादरम्यानं मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. 

हे मार्ग वाहतुकीसाठी बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी पुणे शहर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्वे रस्ता आणि पौड रस्त्याचा काही भाग सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. (Traffic diversions during PM Narendra Modi’s visit to Pune on Sunday)

तसेच गरवारे कॉलेज ते आनंद नगर मेट्रो जंक्शन या मुख्य मार्गाचा विचार करता खंडोजी बाबा चौक ते शिवतीर्थ नगर दरम्यानच्या रस्त्यावर सकाळी 10 ते दुपारी 2  या वेळेत वाहनांना परवानगी दिली जाणार नाही. कर्वे रोडने कोथरूडकडे जाणारी वाहने टिळक चौक आणि तेथून दांडेकर पूल किंवा म्हात्रे पूल डीपी रोडने करिश्मा सोसायटीकडे वळवण्यात येतील. शिवतीर्थ नगर येथून डेक्कन परिसरात येणारी वाहने मयूर कॉलनी येथे वळविण्यात येणार आहेत.