सोलापूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं घौडामैदान जवळ येतंय. अशावेळी राजकारण्यांची एकमेकांवर चिखल फेक होतेय. काँग्रेस आमदार आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांनी एका जाहीर कार्यक्रमात भाजप खासदार बनसोडे यांचा वेबडा खासदार असा उच्चार केला. यानंतर खासदार बनसोडे यांनी देखील चांगलाच समाचार घेत. 'मुंबईत काय चालतं' हे बोलायला लावू नका, ते सांगितलं तर सोलापुरात कठीण होईल, असं वक्तव्य केलं होतं. यामुळे प्रणिती आणि बनसोडे यांच्यातील वाकयुद्ध हे जिल्ह्यात चर्चेचा विषय झालं होतं.
मात्र या वादावर अखेर पडदा पडण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. कारण सुशीलकुमार शिंदे यांनी अतिशय समजदारीने हे प्रकरण हाताळलं आहे.
याबाबत सुशीलकुमार शिंदे यांना विचारले असता, 'बनसोडे यांच्याविषयी चुकून बोलले गेल्याचे प्रणिती यांनी सांगितले. त्यांनी असे बोलावयास नको होते. खासदार बनसोडे यांच्याविषयी आमच्या मनात तशा कोणत्याही भावना नाहीत. ते आमचेच आहेत,' असे त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी नको ते वक्तव्य केल्यानंतर, खासदार बनसोडे यांनीही आश्चर्यचकीत करणारं वक्तव्य केलं होतं. यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यानंतर हा वाद शमण्याची चिन्हं आहेत.