महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या नेत्यांचा मोठा अपमान

वंचितला महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आजच्या ट्रायडंटमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाचे एकमत झालंय

Updated: Jan 30, 2024, 05:34 PM IST
महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या नेत्यांचा मोठा अपमान title=

Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मानापमान नाट्य रंगल.महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या नेत्यांचा मोठा अपमान झाला.  वंचित आघाडीच्या नेत्यांना जवळपास तासभर बैठकीबाहेर बसवल्याचा आरोप केला जात आहे. 

वंचित आघाडीच्या नेत्यांसोबत बैठकीत नेमकं काय घडलं?

हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची  बैठक सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर नाराज होऊन बाहेर पडले. बैठकीवेळी आमचा अपमान करण्यात आला. आम्ही ठरवलेला कॉमन मिनीमन प्रोग्राम मविआला दिल्यानंतर मला बैठकीच्या रूममधून बाहेर जायला सांगितलं. तासभर आम्हाला बाहेर बसवून ठेवलं, असा आरोप डॉ. पुंडकर यांनी केला आहे.

अजुन महाविकास आघाडीचे घटक पक्ष समजता का ? तसं असेल तर आम्हाला पत्र द्या. ⁠शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी पत्र द्यावे.  ⁠जागा वाटप हा वेगळा मुद्दा आहे. पण सध्या काॅमन मिनिमम प्रोग्राम ठरवला पाहीजे. ⁠एकुण 25 मुद्दे आम्ही उपस्थित केले आहेत.  मविआने वंचित बहुजन आघाडीचा अपमान केला आहे.   आम्हाला एक तासाहून अधिक वेळ बैठकीच्या बाहेर ठेवलं. आम्ही ठरवलेला कॉमन मिनीमन प्रोग्राम मविआ दिल्यानंतर आम्हाला बैठकीच्या रूममधून बाहेर बसायला लावलं असा आरोप पुंडकर यांनी केला आहे. 

वंचितला महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्याचा निर्णय झाला

वंचितला महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आजच्या ट्रायडंटमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाचे एकमत झालंय. तसं पत्र मविआ आघाडीनं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना लिहिलंय. यासह जागावाटपावरही आजच्या मविआच्या बैठकीत चर्चा झाली. मराठावाड्यातलं लोकसभेचं जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये...महाविकास आघाडीतील नेते, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या बैठकीला उपस्थित आहेत. 

महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर गैरहजर

महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर गैहजर आहेत. मुंबईत आज ट्रायडन्ट हॉटेलमध्ये मविआची बैठक होत आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र ते उपस्थित राहणार नसल्याचं चर्चा होती. प्रत्यक्षात देखील ते या  बैठकीला उपस्थित नाहीत. अनुपस्थित राहण्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. वंचितकडून प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर बैठकीला उपस्थित आहेत. महाविकास आघाडीच्या बैठकीच्या निमंत्रणावरुन आधीच वाद सुरु होता. बैठकीचे निमंत्रण मिळाल्यानंतर प्रकाश आंबेडकर  यांनी थेट नाना पटोले यांना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला होता.