मोदी आणि ट्रम्पच्या टाळीमुळं शेतकऱ्यांना भुर्दंड- प्रकाश आंबेडकर

  हे सरकार दारुड्याचं असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

Updated: Sep 13, 2019, 06:24 PM IST
मोदी आणि ट्रम्पच्या टाळीमुळं शेतकऱ्यांना भुर्दंड- प्रकाश आंबेडकर  title=

जालना :  हे सरकार दारुड्याचं असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. आज जालन्यात बलुतेदार अलुतेदार सत्ता संपादन निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.. हे सरकार दारुड्याचे असून सरकारवर अंकुश ठेवणार कुणी नाही आहे. त्यामुळे झिंगलेल्या माणसाप्रमाणे हे सरकार चालत आहे.

दारुड्या माणसाचे पैसे संपले की तो घरदार विकून चोऱ्या करतो. त्याचप्रमाणे सरकारचा रिझर्व्ह बँकेच्या पैशावर डोळा असल्याचा आरोपही यावेळी आंबेडकरांनी केलाय. दरम्यान ट्रम्प आणि मोदींच्या टाळीमुळं शेतकऱ्यांना भुर्दंड भरावा लागणार असल्याचंही म्हणत आंबेडकरांनी मोदींचा समाचार घेतला.

मुस्लिम उमेदवार रिंगणात

वंचित बहुजन आघाडीतून एमआयएमने बाहेर पडायचा निर्णय घेतला असला तरी फारसा फरक पडणार नसून वंचित २५ मुस्लिम उमेदवार निवडणुकीत उतरवले अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती येथे दिली. दर्यापूर येथे अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी वर्षा निमित्ताने मातंग समाज सत्ता संपादन व समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीत आम्हाला मुस्लिम समाजाची मते मिळाली नाही. मात्र काही प्रमाणात मुस्लिम समाज आमच्या पाठीशी असून या विधानसभा निवडणुकीत वंचितला मुस्लिमांची देखील मतं मिळतील असे प्रकाश आंबेडकर यांनी बोलतांना सांगितले.