Worli Hit and Run : 'गाडीच्या बोनेटवर हात मारला पण...', कावेरी नाखवाच्या पतीचा आक्रोश; पाहा मन हेलावणारा Video

Worli Hit And Run Case: अखेर मिहीर शाहाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. मिहीर शाहाला फाशीवर लटकवा अशी मागणी मृत महिलेचा पती (Pradeep Nakhava) तसंच मुलीने केलीय.  

सौरभ तळेकर | Updated: Jul 9, 2024, 06:38 PM IST
Worli Hit and Run : 'गाडीच्या बोनेटवर हात मारला पण...', कावेरी नाखवाच्या पतीचा आक्रोश; पाहा मन हेलावणारा Video title=
Pradeep Nakhava cried i Asked Him To Stop Worli Accident Hit and Run Case

Pradeep Nakhava On Worli Accident : वरळी हिट अँड रन प्रकरणात (Worli Hit And Run Case) पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. मुख्य आरोपी मिहीर शाहाच्या (Mihir Shah) पोलिसांनी शहापूरमधून मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेनं मिहीर शाहाला बेड्या ठोकल्या आहेत. मिहीर शाहाला मदत करणाऱ्या 12 जणांनाही ताब्यात घेण्यात आलंय. त्याचसोबत मिहीर शाहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वरळीत BMW कारखाली कावेरी नाखवा (Kaveri Nakhava) या महिलेला या आरोपीनं क्रुरपणे चिरडलं होतं. त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेला चिरडल्यानंतर मिहीर फरार झाला होता. अशातच आता या प्रकरणावर प्रदीप नाखवा (Pradeep Nakhava) यांचा आक्रोश पाहून तुमचं मन देखील हेलावून जाईल.

काय म्हणाले प्रदीप नाखवा?

मी आरोपीला गाडी थांबवण्याची विनंती केली. मी त्याच्या गाडीच्या बोनेटवर हात मारला, तरी पण त्याने गाडी थांबवली नाही. तो वेगाने गाडी चालवत राहिला. तिला किती वेदना झाल्या असतील? सगळ्यांना माहिती आहे, पण काहीही झालं नाही. यासर्वांसाठी प्रशासन जबाबदार आहे. गरिबांचं कोणीही नाहीये. प्रशासन फक्त श्रीमंतासाठी आहे. गरिबांना कोणीही वाली नाही, असं प्रदीप नाखवा यांनी म्हटलं आहे. इथं फक्त राजकारण चालतं, असं म्हणत प्रदीप नाखवा यांनी आक्रोश व्यक्त केला.

नेमकं काय झालं?

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रदीप नाखवा यांनी घटनाक्रम सांगितला होता. अपघात सकाळी 5.30 वाजता झाला. कार मागून आली आणि स्कूटरला धडकली. आमची गाडी एका कोपऱ्यातून 30-35 च्या स्पीडने चालली होती. धडक दिल्यानंतर आम्हाला काही वेळ काय झालं ते समजलंच नाही. आम्ही बोनेटवर पडलो. मी त्याला थांब म्हटल्यावर त्याने ब्रेक मारला असता आम्ही दोघे खाली पडलो. मी डाव्या बाजूला पडलो. मी तिला खेचणार तितक्यात त्याने तिच्या अंगावर गाडी घातली आणि फरफटत नेली. सीजी हाऊस ते सी-लिंक किती लांब आहे, काय तिची अवस्था झाली असेल सांगा". "मला दोन मुलं आहेत, आता मी काय करणार? हे मोठे लोक आहेत, कोणी काही करणार नाही. आम्हालाच त्रास होईल, असं प्रदीप नाखवा यांनी म्हटलं होतं.