प्रभाकर साईल याचा मृत्यू की आत्महत्या? संशयाचे गूढ वाढले

बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर सैल याचा मृत्यू झाला  

Updated: Apr 2, 2022, 12:26 PM IST
प्रभाकर साईल याचा मृत्यू की आत्महत्या? संशयाचे गूढ वाढले title=

मुंबई : मुंबईच्या माहूल येथील वास्तव्यास असलेल्या ठिकाणी तब्येत बिघडल्याने त्याला चेंबूरच्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.

प्रभाकर साईल याचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी त्याचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात नेण्यात आला. प्रभाकर सैल याने काही आरोप केले होते. त्यामुळे त्याचा नेमका मृत्यू कशाने झाला की त्याने आत्महत्या केली याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर त्याच्या अहवालातून त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळणार आहे. प्रभाकर साईल याने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला असावा. तसेच त्याने जर आत्महत्या केली असेल तर त्यामागचे कारण काय याचाही शोध पोलीस घेत आहेत. 

कोण आहेत प्रभाकर साईल

प्रभाकर साईल किरण गोसावीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. एवढंच नाही तर अनेक फोटो आणि व्हिडीओदेखील सादर केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संरक्षणासाठी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव देखील घेतली होती. ज्या क्रूझमधून ड्रग्स हस्तगत करण्यात आले होते, त्या क्रूझबाहेर आपण हजर होतो, असा दावा त्यांनी केला होता.