मुख्यमंत्री साहेब भेदभाव नको... भर कार्यक्रमात का म्हणाले असं अजित पवार?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बेधडक बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत.  

Updated: Apr 2, 2022, 11:27 AM IST
मुख्यमंत्री साहेब भेदभाव नको... भर कार्यक्रमात का म्हणाले असं अजित पवार? title=

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बेधडक बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. आज वडाळा येथील जीएसटी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्यात त्याचा प्रत्यय पुन्हा आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात जुगलबंदीच रंगली.

भूमिपूजन सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आज कोरोना मुक्तीची पहाट घेऊन गुढीपाडवा आला आहे. 2009 ते 2014 या काळातच gst भवन बांधायचे होते. मात्र, काही कारणाने ते जमले नाही. मागील सरकारने हे का केले नाही हे माहित नाही.

आताची Gst भवनाची इमारत देखणी व्हावी म्हणून सर्वानी मदत केली. 1800 कोटी रुपये इतका या इमारतीचा बजेट आहे. ही इमारत बांधताना कुठलीही आर्थिक अडचण येणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. या इमारतीचे काम उत्तम झाले पाहिजे आणि वेळेत झाले पाहिजे, असे ते म्हणाले. 

यानंतर त्यांनी आपला मोर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वळविला. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रमाला येता. पण, आमच्या खात्याच्या कार्यक्रमाला येत नाही. इथे थोडा भेदभाव होतो. आमच्या विभागाच्या कार्यक्रमाला येत नाही त्यामुळे काही बातम्या येतात. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मतभेद आहेत अशा बातम्या येतात. यावर तुम्हीच खर काय ते सांगा, असं ते भर कार्यकमात म्हणाले. यावर सभागृहात हशा पसरला.

यानंतर मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात 'सरकारमध्ये रुसवे फुगवे असल्याचे वातावरण तयार केले जात आहे. काही जण मतभेद आहे अश्या गुढ्या उभारत आहेत मात्र तसे नाही. आम्ही एकत्र आहोत.. म्हणूनच महाविकास आघाडी नाव आहे. अनेक जण नारळ फोडतात मात्र त्यांची कामे होत नाही. आम्ही सगळे एक जुटीने काम करत आहोत आणि जिथे तुम्ही स्वतः आहात तिथे मी येण्याची गरजच नाही असे सांगत अजित दादांचा तो आक्षेप खोडून काढला.