नागपूर : Power shutdown: काही तांत्रिक कामामुळे नागपुरकरांना सहा तास विजेशिवाय काढावे लागणार आहेत. नागपुरात महापारेषणतर्फे तांत्रिक कामाकरिता गोधनी 33 किवी वाहिनीवर आज 6 तासांचे पॉवर शटडाऊन सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. (Power outage in Nagpur for 6 hours today, affecting water supply)
या पॉवर शटडाऊनमुळे नागपूर महापालिका आणि OCW च्या गोधनी पेंच चार जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा देखील खंडीत होणार आहे. त्यामुमुळे पम्पिंग 6 तास बंद राहणार असल्यामुळे नागपूर शहरातील जवळपास 9 जलकुंभावरील पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.
या पावर ब्रेकडाऊनमुळे आशीनगर, लक्ष्मी नगर, धरमपेठ, हनुमान नगर आणि नेहरुनगर झोन्समधील 9 जलकुंभांचा.. ह्यात नारा नारी, जरीपटका (आशी नगर झोन), धंतोली (धरमपेठ झोन), लक्ष्मी नगर (लक्ष्मी नगर झोन), नालंदा नगर, श्रीनगर, ओंकार नगर जुने, नवे, म्हाळगी नगर (हनुमान नगर झोन), तसेच हुडकेश्वर आणि नरसाळा गावचा पाणीपुरवठा आज बाधित राहणार आहे.