Pooja Chavan Suicide Case : ऑडिओ क्लिपमधील आवाज अरुण राठोडचा ? नातेवाईक म्हणतात...

पुजा चव्हाणच्या नातेवाईकांचा ऑडीओ क्लीपमधील आवाजाबद्दल खुलासा 

Updated: Feb 15, 2021, 07:45 PM IST
Pooja Chavan Suicide Case : ऑडिओ क्लिपमधील आवाज अरुण राठोडचा ? नातेवाईक म्हणतात... title=

विष्णू बुर्गे, झी मीडिया, बीड : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात दररोज नवी माहिती समोर येतेय. यावर विरोधकांकडून सरकारला धारेवर धरलं जातंय. सरकार पोलिसांवर दबाव टाकून आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधक करतायत. दरम्यान पुजा चव्हाणच्या नातेवाईकांनी ऑडीओ क्लीपमधील आवाजाबद्दल खुलासा केलाय.  

Pooja chavan zee news के लिए इमेज नतीजे

समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज अरूण राठोडचा नाही असा दावा त्याच्या नातेवाईकांनी केलाय. चौकशीनंतर सत्य समोर येईलच, समाजाला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप अरूणच्या नातेवाईकांनी केलाय.

ऑडिओ क्लिपमधील आवाज अरूण राठोडचा असल्याचा तर्क लावला जातोय. मात्र अरूण हा चांगला मुलगा होता. 20 दिवसांपूर्वीच तो पुण्याला गेला होता असं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. 

पूजाला न्याय मिळाला पाहिजे पण तपासाआधीच तर्कवितर्क नको असं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.