मुंबई - गोवा महामार्गावर आता पोलिसांचा 'तिसरा डोळा'

रायगडचे प्रवेश द्वार असलेल्या पेणमध्ये मुंबई गोवा महामार्गावर आता पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची करडी नजर राहणार आहे.

Updated: May 30, 2022, 03:51 PM IST
मुंबई - गोवा महामार्गावर आता पोलिसांचा 'तिसरा डोळा' title=

रायगड : मुंबई - गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. हे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी या महामार्गावर अत्याधुनिक यंत्रणा उभारली आहे.

रायगडचे प्रवेश द्वार असलेल्या पेण ते खारपाडा या दरम्यान हॉटेल साई सहारा समोर पोलीस मदत चौकी तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे नंबर प्लेट डिटेक्टर CCTV कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.

मुंबई - गोवा महामार्गावर अपघात झालेल्यासाठी कल्पेश ठाकूर हे देवदूत ठरत आहेत. त्यांच्या सहकार्याने ही पोलीस चौकी आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे पोलिसांची अपघातग्रस्त स्थळांवर करडी नजर असणार आहे. तसेच, येथील गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार आहे. अपघात तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस नेहमीच तत्पर असतात. त्याचप्रमाणे नागरिकांची जागरूकता दाखवून पोलिसांना सहकार्य केल्यास हे प्रमाण बऱ्याच अंशी कमी करता येईल असा आशावाद पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी यावेळी व्यक्त केला.