शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्यांची चौकशी झाली पाहीजे- राजू शेट्टी

अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यात शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची खासदार राजू शेट्टी यांनी भेट घेतली.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 26, 2017, 04:32 PM IST
शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्यांची चौकशी झाली पाहीजे- राजू शेट्टी  title=

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यात शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची खासदार राजू शेट्टी यांनी भेट घेतली.

गोळीबार करणाऱ्या पोलिसांची चौकशी​

जखमी झालेल्या शेतकऱ्यांना आज रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे. मात्र, शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या पोलिसांची चौकशी केली पाहिजे अशी मागणी राजू शेट्टी यांनी केलीये. 

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या

त्याचप्रमाणे दबावतंत्राचा वापर करुन प्रश्न सुटणार नाही त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.

एवढेच नाही तर जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे यावेळी राजू शेट्टी म्हणाले.