डी एस कुलकर्णींना धक्का; फसवणूक प्रकरणी आणखी एक अटक

निगडी येथील एका  फ्लॅट मधून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आज दुपारनंतर कोर्टात हजर केलं जाईल.

Updated: May 28, 2018, 11:37 AM IST

पुणे: बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांना फसवल्याप्रकरणी आणखी एक महत्वपूर्ण अटक करण्यात आली आहे. डीएसकेंच्या पत्नी हेंमती कुलकर्णी यांची बहीण अनुराधा पुरंदरे यांना आज (सोमवार, २८ मे)  अटक करण्यात आली. अनुराधा पुरंदरे डीएसकेंच्या कंपनीत आर्थिक व्यवहार सांभाळात. ठेवीदारांचे पैसे आणि बँकांची कर्ज कशी फिरवण्यात आली, हे पैसे कोठे वळवण्यात आले आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ही अटक केल्याचं सांगण्यात आलंय. गेल्या महिन्यभारापासून पोलीस त्यांचा शोध घेत होतै. निगडी येथील एका  फ्लॅट मधून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आज दुपारनंतर कोर्टात हजर केलं जाईल.

पुरंदरेंच्या अटकेमुळे डीएसकेंना धक्का?

अनुराधा पुरंदरे डीएसकेंच्या कंपनीत आर्थिक व्यवहार संभाळायच्या. ठेवीदारांचे पैसे आणि बँकांची कर्ज कशी फिरवण्यात आली. हे पैसे कोठे वळवण्यात आले आहेत. याचा तपास पुरदरेंच्या अटकेने लागण्याची शक्यता आहे. मागील महीनाभरापासून पोलीस त्यांचा शोध घेत होतै. निगडी येथील एका  फ्लॅट मधून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आज दुपारनंतर कोर्टात हजर केलं जाईल.