बिस्किट, चिवडा खाल्याने ७० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा

शाळेत वाटप केलेल्या बिस्किट आणि चिवडा खाल्याने ७० हून अधिक  विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.  

Updated: Apr 17, 2018, 09:01 AM IST
बिस्किट, चिवडा खाल्याने ७० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा title=

नांदेड : शाळेत वाटप केलेल्या बिस्किट आणि चिवडा खाल्याने ७० हून अधिक  विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील हाडोळी आणि  कामनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ल्ड व्हिजन नामक सामाजिक संस्थेने शिबीर घेतले होते. यावेळी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना दुपारपासून त्रास

बिस्कीट आणि चिवडा खाल्याने विद्यार्थ्यांना उलट्या होऊन त्रास सुरू झाला. दुपारपासून त्रास सुरू झाल्याने एकापाठोपाठ अनेक विद्यार्थी भोकर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी येत होते. दोन्ही गावांत विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने  बालकांना विषबाधा झाल्याचे गावकऱ्यांच्या  लक्षात आले.

विषबाधा झाल्याची बाब उघड

 ग्रामस्थांनी विषबाधा झालेल्या बालकांना भोकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रात्री १० वाजेपर्यंत तबबल ७० हून अधिक विद्यार्थी दाखल झाले. या सर्वांवर उपचार करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेय.