सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी अकरा वाजता सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये त्यांच्या सभेला सुरूवात झाली. सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत आजवर झालेल्या कामाचं उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरिदीपसिंग पुरी यांच्यासह स्थानिक मंत्री उपस्थित आहेत. शहराच्या सौंदऱ्यात भर घालणाऱ्या प्रकल्पांचे लोकार्पण यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. विठ्ठल, सिद्धेश्वर, स्वामी समर्थांना नमन करत त्यांनी भाषण सुरू केले. आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दलही त्यांनी सर्वांचे अभिनंदन केल. तसेच राज्यसभेतही हे मंजूर होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
लोसभेत अजून एक बील काल पास झाले आहे. ज्यामुळे पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान मधून भारतात आलेल्या बाधंवाना भारतीय नागरीकत्व मिळणार आहे.त्यांच्या अडचणी दूर होणार असल्याचे ते म्हणाले.
आरक्षणाच्या नावावर काही लोक आदीवासी, ओबीसी , मागासवर्गीय यांच्यातील काही काढून घेऊ इच्छित होत. मात्र आम्ही या विधेयकाद्वारे सर्वांना चपराक दिली आहे. आता आदीवासी, मागासवर्गीय आणि ओबीसींचे आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही असा विश्वास पंतप्रधानांनी दिला.
सोलापूरच्या भूमितून देशाला शुभेच्छा देऊ इच्छितो. काल रात्री उशिरा सर्व स्तरातील गरीबांना आरक्षण विधेयक मंजूर झालंय. सबका साथ सबका वीकास याचं हे विधेयक उदाहरण आहे. राज्यसभेतही आज हे विधेयक मंजूर होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 30 हजार घरांचा शिलान्यास..प्रत्येक महिन्यात 800 घरे बनवणार
स्मार्टसिटी अंतर्गत विविध विकासकामे सोलापूरकरांच्या जीवनशैलीत सुधारणा आणणार आहे.
उजनी कालव्याची क्षमता वाढवणार
सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
सोलापूर-उस्मानाबाद-येडशी महामार्गाचं लोकार्पणदेखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. रिमोट कंट्रोल द्वारे हे लोकार्पण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी आडाम मास्तरांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांचे तोंडभरून कोतूक केले.
58 किमीचं रस्त्याचं लोकार्पण आज होतंय आणि उर्वरित काम देखील पुढच्या दोन महिन्यात पूर्ण होईल असे आश्वासन केंद्रीय वाहतूक आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. सोलापूर जिल्ह्याची पाणी टंचाई लक्षात घेता चार ब्रीज कम बंधारे मंजूर करण्यात येत असल्याचे गडकरींनी सांगितले.
माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या ३० हजार असंघटित कामगारांच्या घरकुलांची पायाभरणीदेखील पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे.
1 हजार कोटींची कामे मार्गी लागल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर वासियांना सांगितले. याठिकाणाहून जाणाऱ्या ज्ञानोबा तुकोबांची पालखी चकचकीत रस्त्यांवरून जाणार असून कोणताही त्रास वारकऱ्यांना होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगितले.