पिंपरी चिंचवडमध्ये शस्त्रांस्त्रांचं प्रदर्शन

 भारतीय सैन्याकडे कोणते रणगाडे आहेत, त्यांची शस्त्र कशी आहेत हे सगळं पाहायचं असेल तर तुम्ही पिंपरी चिंचवडच्या एच ए मैदानावर या.

Updated: Aug 12, 2017, 04:17 PM IST
पिंपरी चिंचवडमध्ये शस्त्रांस्त्रांचं प्रदर्शन title=

पिंपरी चिंचवड : भारतीय सैन्याकडे कोणते रणगाडे आहेत, त्यांची शस्त्र कशी आहेत हे सगळं पाहायचं असेल तर तुम्ही पिंपरी चिंचवडच्या एच ए मैदानावर या.. पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप ऑफ खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने हे अनोखे प्रदर्शन भरवण्यात आलय.. क्नो युअर आर्मी या संकल्पनेतून हे प्रदर्शन भरवण्यात आलंय.

युद्धात वापरले जाणारे रणगाडे, शस्त्र असं बरंच काही पाहण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. हे प्रदर्शन पहाण्यासाठी विद्यार्थ्यासह नागरिकांनीही मोठी गर्दी केली. या प्रदर्शनाच्या निमित्ताने लष्कराच्या जवानांच्या धैर्याचा शौर्याचा परिचय ही विद्यार्थ्यांना होणार आहे....तुमच्या लष्कराला जाणून घेण्याची ही अनोखी संधी आहे. आज या पदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.