राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंवर दिवसा ढवळ्या गोळीबार

पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

Updated: May 12, 2021, 05:10 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंवर दिवसा ढवळ्या गोळीबार title=

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर दुपारी दीडच्या सुमारास गोळीबार झाला आहे. ठेकेदारीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती सध्या समोर आली आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही. अण्णा बनसोडे देखील या गोळीबारातून वाचले आहेत.

नेमकं काय घडलं?

अण्णा बनसोडे यांनी दोन मुलांना मदतीच्या हेतूने कामाला लावं असे अँथनी नावाच्या ठेकेदाराला सांगितले होते. परंतु अण्णा बनसोडेचे न एकता अँथनीने त्यांने अरेरावीची उत्तरे दिली. सकाळी अँथनी सोबत त्याचा मेव्हणा देखील आला होता. त्यावेळेस त्याने त्याची बंदूक काढली आणि व्यक्तीनं गोळीबार केला.

सुदैवाने कोणीही या गोळीबारात जखमी झालेले नाही. मात्र, या प्रकरणामागे नेमकं काय आहे हे पोलिसांना तपासणी दरम्यान समोर येईल. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

अण्णा बनसोडे कोण आहेत?

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून अण्णा बनसोडे हे विजयी झाले आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघातून निवडणूकीसाठी उभे राहिले होते. त्यांनी या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा 16 हजार 856 मतांनी पराभव केले होते.  त्याआधीच्या निवडणूकीत म्हणजेच 2014 मध्ये अण्णा बनसोडे यांना गौतम चाबुकस्वार यांनी 2 हजार मतांनी पराभव केले होते.

2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी पिंपरी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला होता. त्यामुळे त्यांना 2019 ची निवडणूक इतक्या प्रचंड मतांनी जिंकणे शक्य झाले. यापुर्वी ते 2009 मध्ये देखील अण्णा बनसोडे निवडून आले होते.